23 November 2024 12:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअरने 1 महिन्यात दिला 20% परतावा, पुढे काय होणार? तज्ज्ञांचा सल्ला काय?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.3 टक्क्यांच्या वाढीसह 18.47 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.77 टक्क्यांच्या वाढीसह 18.02 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.65 टक्के घसरणीसह 18.03 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक 19.89 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव बुधवारी संपला होता, त्यात व्होडाफोन आयडिया कंपनीने देखील भाग घेऊन बोली लावली होती. यातून भारत सरकारला 96000 कोटी रुपये बोलीच्या तुलनेत 11340 कोटी रुपये मिळाले आहे. यासाठी राखीव मूल्य 9638.45 रुपये निश्चित करण्यात आले होते.

टेलिकॉम स्पेक्ट्रम लिलाव पूर्ण झाल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात दूरसंचार विभागाने माहिती दिली की, “देशातील तीन प्रमुख दूरसंचार सेवा प्रदाता रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी या लिलावात भाग घेतला होता. या तिन्ही कंपन्यांनी मिळून 141.4 मेगाहर्ट्झ ऑफर्स केलेल्या स्पेक्ट्रमपैकी 26.4 टक्के भागावर बोली लावली आहे. या लिलावासाठी राखीव मूल्य 96,238.45 कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. यामध्ये 10,522.35 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा लिलाव होणे अपेक्षित होते”.

टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांसाठी 800 MHz, 900MHz, 1800 MHz, 2100MHz, 2300 MHz, 2500MHz, 3300 MHz आणि 26 GHz स्पेक्ट्रम बँड ऑफर करण्यात आले होते. दूरसंचार कंपन्यांनी 900 MHz, 1800MHz, 2100 MHz आणि 2500 MHz बँडसाठी बोली लावली आहे. यामध्ये भारती एअरटेल कंपनीने सर्वाधिक म्हणजेच 6856.76 रुपये मूल्याची बोली लावली होती. तर व्होडाफोन आयडिया कंपनीने 3510.40 कोटी रुपये मूल्याची बोली लावली होती. आणि रिलायन्स जिओ कंपनीने 973.62 कोटी रुपये मूल्याची बोली लावली होती. या लिलावात सर्वात कमी बोली जिओ कंपनीने लावली होती.

व्होडाफोन आयडिया स्टॉक टेक्निकल चार्टवर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे. दैनिक चार्टवर हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉकने 16.80-16 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्यासाठी स्टॉकने 18.40 रुपये किमतीवर ब्रेकआऊट देणे अपेक्षित आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 20.40 ते 23.60 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकने 16.80 रुपये किमतीवर अल्पकालीन सपोर्ट निर्माण केला आहे. व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये 20 रुपये टार्गेट गाठण्याची क्षमता आहे. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 16 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. व्होडाफोन आयडिया या कंपनीची स्थापना 2018 साली झाली होती. व्होडाफोन ग्रुपने आपला भारतातील व्यवसाय आयडिया सेल्युलर कंपनीमध्ये विलीन केला होता. 21 मे 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे 38.17 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x