5 July 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांना वयाच्या 25 वर्षांपासून महिना रु.25000 पगार असेल तरी EPF चे 2 कोटी रुपये मिळणार SBI Mutual Fund | ही योजना पगारदारांचं आयुष्य बदलू शकते, रु.10,000 बचतीवर 7 कोटी रुपये परतावा मिळेल Railway Ticket Booking | ट्रेन सुटल्यानंतर 10 मिनिटात सीटवर न पोहोचल्यास तिकीट रद्द होणार, रेल्वेकडून मोठी अपडेट Income Tax on Salary | पगारदारांसाठी खुशखबर! स्टँडर्ड डिडक्शन रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत वाढून फायदा मिळणार Home Loan EMI with SIP | गृह कर्जाची सर्व रक्कम व्याजासह अशी वसूल करा, अर्जासोबत करा के काम, फायदाच फायदा GPF Interest Money | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! GPF पैशाबाबत फायद्याची अपडेट, अधिक रक्कम मिळणार Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरची रेटिंग अपग्रेड, ₹28 प्राईस स्पर्श करणार
x

HDFC Bank Share Price | बँक शेअर मालामाल करणार, ब्रेकआउट देताच ₹2100 प्राईसला स्पर्श करणार

HDFC Bank Share Price

HDFC Bank Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या तेजीचे नेतृत्व ICICI बँक आणि HDFC बँक करत आहेत. एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचे शेअर्स 1700 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. CLSA फर्मच्या तज्ञांच्या मते, एचडीएफसी बँकेचे शेअर्स सध्या ब्रेकआउट देण्याच्या मार्गावर आहे. ( एचडीएफसी बँक अंश )

तज्ञांच्या मते, या स्टॉकला 1,717 रुपये ते 1,734 रुपये दरम्यान मजबूत प्रतिकार मिळत आहे. आणि या स्टॉकने 1,240 रुपये ते 1,245 रुपये किमतीच्या दरम्यान सपोर्ट निर्माण केला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 1,685 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जर एचडीएफसी बँक स्टॉकने ब्रेकआउट दिला तर शेअर 2,373 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणजेच गुंतवणुकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 40 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील चार वर्षांत एचडीएफसी बँकेचा ROA 1.8 टक्क्यांवरून वाढून 2.1 टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मने एचडीएफसी बँक स्टॉकवर 2,100 रुपये ही अल्पकालीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये एचडीएफसी बँकेचे शेअर्स 2.50 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एचडीएफसी बँकेचे शेअर्स फक्त 3 टक्के वाढले आहेत. मागील दोन वर्षांत हा स्टॉक 25 टक्के मजबूत झाला आहे.

मागील तीन वर्षांत या बँकेच्या शेअर्सने 12 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर 27 जून 2024 पर्यंत HDFC बँक ही रिलायन्स इंडस्ट्रीज आणि TCS नंतर बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. एचडीएफसी बँकेचे एकूण बाजार भांडवल 12,92,011.33 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Bank Share Price NSE Live 28 June 2024.

हॅशटॅग्स

#HDFC Bank Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x