22 April 2025 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH
x

Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत नफा वसुलीला बळी पडले होते. नुकताच भारतातील दूरसंचार कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमसाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात 11000 कोटींपेक्षा जास्त बोली लावल्या आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनीने देखील या बोलीत भाग घेतला होता. या कंपनीने निम्न आणि मध्यम बँडमध्ये 50 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

या बातमीमुळे व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. या लिलावात 2500 मेगाहर्ट्झसाठी बोली लावणारी व्होडाफोन आयडिया ही एकमेव दूरसंचार कंपनी होती. तसेच या कंपनीने 900 MHz आणि 1800 MHz साठी देखील बोली लावली आहे. शुक्रवार दिनांक 29 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 3.35 टक्के घसरणीसह 17.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मोतीलाल ओसवाल फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 20 रुपये प्राइस आणि 17 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जर हा स्टॉक 20 रुपये किमतीच्या पुढे गेला तर शेअर मजबूत कमाई करून देऊ शकतो. मार्च 2019 मध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

5G स्पेक्ट्रम लिलावात व्होडाफोन आयडिया कंपनीने 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्झ आणि 2500 मेगाहर्ट्झसाठी आणि 50 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. यासाठी कंपनीने 3510 कोटी रुपये खर्च केले आहे. याशिवाय पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सर्कलमध्ये 900 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीने 7 वेगवेगळ्या सर्कलमध्ये 900 MHz स्पेक्ट्रम होल्डिंग देखील वाढवली आहे. यामुळे कंपनीच्या 4G ग्राहकांना उत्तम सुविधा देता येईल.

नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीने 18000 कोटी रुपये मूल्याचा एफपीओ लाँच केला होता. कंपनीचा FPO 25 एप्रिल 2024 रोजी 11 रुपये इश्यू किंमतीसाठी लाँच करण्यात आला होता. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्के वाढली आहे. तर मागील एका आठवड्यात हा स्टॉक 10 टक्के मजबूत झाला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक 20 टक्के आणि तीन महिन्यांत 36 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 29 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या