21 November 2024 9:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRFC Share Price | IRFC सहित या 3 PSU शेअर्सवर होणार परिणाम, सरकारच्या निर्णयाने फायदा की नुकसान?

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील एका वर्षात सरकारी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सध्या जर तुम्ही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

केंद्र सरकार माझगाव डॉक, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड आणि नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड कंपनीमधील शेअर्स विकून भांडवल उभारणी करण्याचा विचार करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरएफसी स्टॉक 174 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर माझगाव डॉक स्टॉक 4284 रुपये किमतीवर, आणि नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर स्टॉक 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

केंद्र सरकार लवकरच PSU क्षेत्रातील अनेक कंपन्यांमधील हिस्सा कमी करून पैसा उभारणार आहे. यांमध्ये मुख्यतः रेल्वे, खत आणि संरक्षण क्षेत्रातील काही कंपन्या सामील आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये निर्गुंतवणुकीबाबत कोणतीही तरतूद केलेली नव्हती. मात्र सरकार आपल्या भांडवली प्राप्तीचा आकडा 50,000 कोटी रुपयेजवळ ठेवू इच्छित आहे. यासाठी केंद्र सरकार पुढील काळात आयआरएफसी कंपनीमधील आपला 11.36 टक्के वाटा विकून 7600 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखत आहे.

आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 0.75 टक्के घसरणीसह 172.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आयआरएफसी कंपनीमध्ये भारत सरकारचा वाटा 86.36 टक्के आहे. ही कंपनी मुख्यतः भारतीय रेल्वेला वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते. 29 जानेवारी 2021 रोजी आयआरएफसी स्टॉक 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या नीचांक किंमत पातळीवरून आयआरएफसी स्टॉक 600 टक्के वाढला आहे.

मोदी सरकार पुढील काळात माझगाव डॉक कंपनीमधील 10 टक्के भाग भांडवल विकून निधी उभारणीची योजना आखत आहे. केंद्र सरकारने या कंपनीचे 84.83 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट RCF कंपनीमधील 10 टक्के आणि नॅशनल फर्टिलायझर कंपनीमधील 20 टक्के भागभांडवल विकून 1200 कोटी रुपये भांडवल उभारण्याची योजना आखत आहे.

सरकारी कंपन्यांमधील शेअर्स विकून भांडवल उभारण्यामागे केंद्र सरकारचा हेतू वित्तीय तूट कमी करण्याचा आहे. केंद्र सरकारला अपेक्षा आहे की यामुळे सरकारी कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि खाजगी गुंतवणुकीचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्यास कंपन्यांची कार्यक्षमता मजबूत वाढेल. सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमाचे यश किंवा अपयश हे शेअर बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 01 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x