25 November 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Alok Industries Share Price | 29 रुपयाचा रिलायन्स ग्रुप संबंधित शेअर, संधी सोडू नका, मालामाल करणार

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानींच्या मालकीच्या कंपनीचे शेअर्स सध्या 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 39.24 रुपये होती. जानेवारी 2024 पासून हा स्टॉक 25 ते 35 रुपये दरम्यान ट्रेड करत आहे. जुलै 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 14.56 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )

आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने 28 जून 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अनिल कुमार मुंगड यांना 01 जुलै 2024 पासून कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून नियुक्त केले आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 0.95 टक्के घसरणीसह 29.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अनिल कुमार मुंगड हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांना वित्त आणि लेखा क्षेत्रात काम करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. सीईओ इनसाइट एशिया मॅगझिनने 2022 मध्ये टॉप 10 सीएफओच्या यादीत त्यांचे नाव सामील केले होते. 2002 पासून ते रिलायन्स ग्रुपमध्ये काम करत आहेत. आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

मुकेश अंबानी हे देखील आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये सामील आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायंस इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर जेएम फायनान्शियल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स म्हणजेच 34.99 शेअर्स धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 02 July 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x