7 July 2024 11:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुम्ही महिना 3000 रुपये बचत करा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा, स्मार्ट गुंतवणूक समजून घ्या Bajaj Freedom 125 | बजाज फ्रीडम 125 CNG ने 1 रुपयात 1 KM प्रवास, खरेदीपूर्वी बाईकचे 5 फीचर्स नोट करा Post Office Scheme | फायद्याची खास पोस्ट ऑफिस योजना! व्याजातून ₹79,564 प्लस ₹4,99,564 परतावा मिळेल Yes Bank Share Price | आता थांबणार नाही हा शेअर! तुफान तेजीचे संकेत, सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा Income Tax Notice | पगारदारांनो! ITR मध्ये या 11 पैकी कोणतीही एक चुक केल्यास इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Numerology Horoscope | 07 जुलै 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल SJVN Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करा, ब्रेकआउटचे संकेत, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
x

IREDA Share Price | PSU शेअर ₹32 वरून ₹200 वर पोहोचला, कंपनीबाबत गुड-न्यूज आली, आता पुन्हा तेजी

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 200 रुपये किमतीवर ओपन झाले होते. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 202 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र आज हा स्टॉक किंचित खाली आला आहे. जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 9136 कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याची माहिती जाहीर केली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1893 कोटी रुपये कर्ज वितरीत केले होते. वार्षिक आधारावर कंपनीच्या कर्ज वितरणात 382.62 टक्के वाढ झाली आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.46 टक्के घसरणीसह 195.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 30 ते 32 रुपये होती. एका लॉटमध्ये आयआरईडीए कंपनीने 460 शेअर्स ठेवले होते. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 14,720 रुपये जमा करावे लागले होते. आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 56 टक्के प्रीमियम वाढीसह 50 रुपये किमतीवर झाली होती. या कंपनीच्या IPO चा आकार 2150.21 कोटी रुपये होता.

आयआरईडीए कंपनीने आपल्या IPO मध्ये 40.32 कोटी फ्रेश शेअर्स जारी केले होते. तर 26.88 कोटी शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले होते. 3 दिवसांच्या सबस्क्रिप्शन कालावधीत या कंपनीचा IPO 45 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

आयआरईडीए कंपनीमध्ये भारत सरकारने एकूण 75 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 22.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मार्च तिमाहीपर्यंत म्युच्युअल फंडांनी या कंपनीचे 1 टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स होल्ड केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 02 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x