7 July 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या BEML Share Price | झटपट पैसा मिळतोय! मागील 1 महिन्यात दिला 38 टक्के परतावा, खरेदी करा हा शेअर Ircon Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, कंपनी ऑर्डर बुकचा 27,208 कोटी रुपयांवर Bigbloc Share Price | संधी सोडू नका! फ्री बोनस शेअर्स मिळतील, शॉर्ट टर्म मध्ये वाढेल पैसा NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळण्याचे संकेत Suzlon Share Price | आता थांबणार नाही सुझलॉन शेअर! 5 तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस ₹17, सुसाट तेजीत परतावा मिळणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकवर अमेरिकेतील सिटी फर्मने अहवाल प्रसिद्ध केला आहे. तज्ञांनी या स्टॉकची रेटिंग अपग्रेड करून ‘बाय’ केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात मजबूत वाढू शकतो, म्हणून त्यांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

नुकताच टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल सेवेच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडिया स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.08 टक्के घसरणीसह 17.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांनी व्होडाफोन आयडिया शेअरवर नवीन टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 23 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. एकदा जर व्होडाफोन आयडिया स्टॉक 23 रुपये किमतीवर स्थिर झाला तर पुढील टार्गेट प्राइस 28 रुपये असेल. जर हा स्टॉक विक्रीच्या दबावात आला तर शेअरची किंमत 14 रुपयेपर्यंत खाली येऊ शकते. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक 15 टक्के वाढला आहे. तर मागील 3 महिन्यांत शेअरची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 136 टक्के नफा कमावून दिला आहे.

सिटी रिपोर्टनुसार, 5G रोलआउट सुरू झाले आहे. टेलिकॉम क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे की, 349 रुपये मूल्याची सुरुवातीची योजना टेलिकॉम कंपन्यांना ARPU वाढवण्यास मदत करेल. व्होडाफोन आयडिया कंपनी आपले कर्ज कसे कमी करता येईल यासाठी प्रयत्न करत आहे. एजीआर प्रकरणात व्होडाफोन आयडिया कंपनीला सर्वोच्च न्यायालयाकडून किंचित दिलासा अपेक्षित आहे. या कंपनीतील परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा कमी झाला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये FII चा वाटा 2.46 टक्के होता. तर डिसेंबर 2023 मध्ये त्यांचा वाटा 2.27 टक्क्यांवर आला होता. मार्च 2024 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये FII चा वाटा 1.97 टक्क्यावर आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 02 July 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x