23 November 2024 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा?

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स सोमवारी 1,475 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.2 लाख कोटी रुपये आहे. अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 708 रुपये होती. या किमतीवरून हा स्टॉक 110 टक्क्यांनी वाढला आहे. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 0.010 टक्के घसरणीसह 1,474.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये विस्तार करण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक केली आहे. भारतातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेट करणारी कंपनी म्हणून अदानी पोर्ट्स कंपनीने आपले स्थान मजबूत केले आहे. नुकताच अदानी पोर्ट्स कंपनीने गोपाळपूर बंदरातील 95 टक्के भागभांडवल खरेदी केले आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवर अदानी पोर्ट्स कंपनीची उपस्थिती मजबूत झाली आहे. या पोर्टची क्षमता 20 MMTPA पेक्षा जास्त कार्गो हाताळण्याची आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीने कराईकल बंदरात यशस्वीरित्या आपले कामकाज सुरू केले आहे. यासह कंपनीने धमरा एलएनजी टर्मिनलवर देखील कामकाज सुरू केले आहे. अदानी पोर्ट्स कंपनी हल्दिया टर्मिनलमध्ये 2026 पर्यंत काम सुरू करणार आहे. विझिंजममधील अदानी पोर्ट कंपनीचे आंतरराष्ट्रीय बंदर, 2025 पर्यंत कार्यान्वित होईल. अदानी पोर्ट्स स्टॉक आता सेन्सेक्स इंडेक्सचा भाग बनला आहे. 27 जून रोजी अदानी पोर्ट्स स्टॉकने विप्रो स्टॉकची जागा घेतली आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीने लॉजिस्टिक मालमत्तेचा मजबूत बेस तयार केला आहे, यामध्ये ट्रेन, मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क, रेल्वे ट्रॅक, वेअरहाऊसिंग आणि अंतर्देशीय कंटेनर डेपो यांचा समावेश आहे, अदानी पोर्ट्स कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2024-26 पर्यंत 14 टक्के आणि PAT 15 CAGR दराने वाढू शकतो, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने अदानी पोर्ट्स स्टॉकवर 1,700 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 02 July 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x