22 November 2024 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूकदार खूष

HDFC Bank Share Price

HDFC Bank Share Price | एचडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स आज जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मात्र पुढील काळात परकीय गुंतवणूकदारांच्या होल्डिंगमध्ये होणारी वाढ आणि एमएससीआय निर्देशांकात एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढण्याच्या अपेक्षेने शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. ( एचडीएफसी बँक अंश )

अनेक जागतिक ब्रोकरेज फर्म एचडीएफसी बँक स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. मागील एका महिन्यात एचडीएफसी बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी एचडीएफसी बँक स्टॉक 2.30 टक्के घसरणीसह 1,728 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म UBS ने एचडीएफसी बँकेच्या स्टॉकवर 1900 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. त्याच वेळी, जेफरीज फर्मने एचडीएफसी बँक स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीज फर्मने एचडीएफसी बँक स्टॉकवर 1880 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मागील एका महिनाभरात या बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळाली आहे.

जून 2024 तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांची शेअर होल्डिंग 55 टक्क्यांवर आली आहे. एफपीआय होल्डिंगमध्ये घट झाल्यामुळे परकीय हेडरूम वाढले आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की परकीय गुंतवणूकदारांची शेअरहोल्डिंग कमी झाल्याने एमएससीआय निर्देशांकात एचडीएफसी बँकेचे वेटेज वाढू शकते. या निर्देशांकात एचडीएफसी बँकेचे वेटेज 3.8 टक्क्यांवरून 7.2-7.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. वेटेज वाढल्यामुळे एचडीएफसी बँकेत 300-400 कोटीं डॉलर्स गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC Bank Share Price NSE Live 04 July 2024.

हॅशटॅग्स

#HDFC Bank Share Price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x