22 November 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

TARC Share Price | मल्टिबॅगर शेअरने 1 वर्षात 243% परतावा दिला, आता तज्ज्ञांनी मोठा अंदाज व्यक्त केला

TARC Share Price

TARC Share Price | टीएआरसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 209.25 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. दिवसाभराच्या व्यवहारात हा स्टॉक 8 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 225 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 4.44 टक्के वाढीसह 217.4 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टीएआरसी लिमिटेड कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 243 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी टीएआरसी स्टॉक 1.94 टक्के वाढीसह 221.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एम्बिट रिसर्च फर्मने टीएआरसी लिमिटेड कंपनीचे कव्हरेज सुरू केले आहे. या स्टॉकमध्ये 217 रुपये किंमत पातळीजवळ 50 टक्केची चढ-उतार पाहायला मिळू शकते. एम्बिट फर्मच्या मते टीएआरसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 325 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, टीएआरसी लिमिटेड कंपनी मजबूत रोख प्रवाहाद्वारे आपला ताळेबंद मजबूत करू शकते. तज्ञांच्या मते, टीएआरसी लिमिटेड कंपनीचा कर्ज इक्विटी गुणोत्तर आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये 1x होता, जो आता 2024-2025 मध्ये 0.1x पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. टीएआरसी लिमिटेड कंपनीने 2026 पर्यंत कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

टीएआरसी लिमिटेड या कंपनीची स्थापना एक बांधकाम आणि कंत्राटी व्यवसाय करणारी कंपनी म्हणून झाली होती. तेव्हापासून ही कंपनी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण रिअल इस्टेट डेव्हलपमेंट फर्म म्हणून नावारूपाला आली आहे. टीएआरसी लिमिटेड ही कंपनी 500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या लँड बँकसह एक मोठी लक्झरी गृहनिर्माण विकासक होण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TARC Share Price NSE Live 04 July 2024.

हॅशटॅग्स

TARC Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x