6 October 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | पेन्शन सुरू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांनी या वेळेतच द्यावे लागेल लाईफ सर्टिफिकेट, अपडेट जाणून घ्या Bigg Boss Marathi Finale | 'आज की रात मजा हुस्न का', जानवी आणि बाईईईच्या मादक अंदाजामुळे बिबींचं घर पेटलं - Marathi News Insurance Claim | गरजेच्या वेळीच अडकाल, इन्शुरन्स क्लेम करताना या 5 चुका टाळा, अन्यथा 1 रुपयाही मिळणार नाही - Marathi News HDFC Mutual Fund | इथे पैसा वाढतो, या म्युच्युअल फंड योजनेत 10 हजारांच्या SIP वर मिळेल 1.80 कोटी रुपये परतावा - Marathi News NPS Vatsalya | कुटुंबातील मुलांच्या नावे महिना रु.3000 बचत करा, मिळेल 13 लाख रुपये परतावा - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो, फक्त 5 वर्षात पैसा 4 पटीने वाढवते ही SBI SIP योजना, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
x

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीजचा पेनी शेअर मालामाल करणार, वेळीच संधीचा फायदा घ्या

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | आलोक इंडस्ट्रीज या रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. आलोक इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः कापड क्षेत्रात व्यवसाय करते. मागील एका महिन्यात आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( आलोक इंडस्ट्रीज कंपनी अंश )

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 35 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी आलोक इंडस्ट्रीज स्टॉक 0.43 टक्के घसरणीसह 28.11 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 28.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दरम्यान दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 29.19 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 39.24 रुपये होती. तर 31 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.56 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

नुकताच आलोक इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या व्यवस्थापन मंडळात मोठे फेरबदल केले आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने अनिल कुमार मुगड यांची 1 जुलै 2024 पासून कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि प्रमुख व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अनिल मुंगड हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. या क्षेत्रात त्यांना 30 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.

मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीचा 75 टक्के वाटा प्रवर्तकांनी धारण केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही आलोक इंडस्ट्रीज कंपनीची प्रवर्तक कंपनी आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आलोक इंडस्ट्रीज कंपनीचे 1,98,65,33,333 शेअर्स म्हणजेच 40.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर जेएम फायनान्स फर्मने या कंपनीचे 1,73,73,11,844 शेअर्स म्हणजेच 34.99 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price NSE Live 05 July 2024.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x