20 September 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News EPF On Salary | तुमचा पगार 25,000 रुपये असेल तर EPF खात्यात किती रक्कम जमा होईल लक्षात घ्या - Marathi News
x

NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी या महारत्न दर्जा असलेल्या पॉवर स्टॉकमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळाली. मात्र या कमजोरीतही एनटीपीसी स्टॉक 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. सध्या भारतीय पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( एनटीपीसी कंपनी अंश )

एनटीपीसी स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 1.78 टक्के वाढीसह 379.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एनटीपीसी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 395 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 5 जुलै 2024 रोजी एनटीपीसी कंपनीचे शेअर्स 380 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 15 रुपयेपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

मागील एका वर्षात एनटीपीसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 96 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 20 टक्के मजबूत झाला आहे. 2024 यावर्षात एनटीपीसी स्टॉकची किंमत 22 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 395 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 184.75 रुपये होती. एनटीपीसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.68 लाख कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, भारत सरकार आपली कोल कॅपॅसिटी ऑर्डर क्षमता वाढवू इच्छित आहे. यामुळे पुरवठा साखळीत काही समस्या निर्माण होऊ शकतात. एनटीपीसी कंपनीची कोळसा आधारित वीज निर्मिती क्षमता मजबूत आहे. त्यामुळे आता कंपनीने दीर्घकालीन वाढीसाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये प्रवेश करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे या स्टॉकचे मूल्यांकन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NTPC Share Price NSE Live 06 July 2024.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x