Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक BUY, Hold की Sell करावा?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकची रेटिंग आणि टार्गेट प्राइस डाऊनग्रेड केली आहे. जागतिक पातळीवरील निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता, अनिश्चितता, टाटा स्टील कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित पैलू आणि चीनमधून स्टीलची वाढलेली निर्यात या कारणांमुळे टाटा स्टील कंपनीसमोर आव्हाने निर्माण झाली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 172.49 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
एक वर्षापूर्वी शेअर बाजारातील 33 तज्ञांनी टाटा स्टील स्टॉक कव्हर केला होता. त्यापैकी 26 जणांनी या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. सध्या केवळ 14 तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. 3 जणांनी हा स्टॉक तत्काळ विकण्याचा सल्ला दिला आहे. तर 9 तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर होल्ड रेटिंग जाहीर केली आहे.
तज्ज्ञांच्या मते भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे बांधकामाशी संबंधित कामे मंदावतील, आणि स्टीलच्या मागणीवर परिणाम पाहायला मिळेल. नजीकच्या भविष्यात स्टीलच्या किमतीत फारशी वाढ होणार नाही. खर्चाच्या बाबतीत कोकिंग कोळशाच्या वाढत्या किमतीमुळे स्टील कंपन्यांच्या मार्जिनवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.
इलारा सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, भारताने चीनमधून होणारी पोलाद आयात वाढवली आहे. त्यामुळे भारतात देखील स्टीलची किंमत कमी झाली आहे. यासह चीनमधून विविध देशांना होणाऱ्या पोलाद निर्यातीमुळे जागतिक स्तरावर स्टीलच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. मागील तिमाहीत चीनमधून झालेल्या पोलाद निर्यातीची किंमत 25 डॉलर्स प्रति टन घसरली होती. सध्याची स्टील क्षेत्रातील मंदीची परिस्थिती पाहून अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Steel Share Price NSE Live 08 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC