24 November 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

IRFC Share Price | PSU शेअरने 6 महिन्यात पैसे दुप्पट केले, तर 1 वर्षात 518% परतावा दिला, खरेदी करा शेअर

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी स्टॉकमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 205.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक पातळीवर पोहचले होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 518 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी आयआरएफसी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.18 लाख रुपये झाले आहे.

सोमवारी आयआरएफसी स्टॉक 193.50 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसभारत या स्टॉकने 205.80 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 32.35 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 3.02 टक्के घसरणीसह 195.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 5 दिवसांत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात हा स्टॉक तब्बल 102 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. 3 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर 24.80 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. आता हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 720 टक्के वाढवले आहे.

आयआरएफसी कंपनीमध्ये भारत सरकारने 86.36 टक्के भागभांडवल धारण केले आहे. 31 डिसेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत आयआरएफसी कंपनीमधील परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा 1.15 टक्क्यांवरून कमी होऊन 1.08 टक्क्यांवर आला आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपला वाटा 1.15 टक्क्यांवरून कमी करून 0.88 टक्क्यांवर आणला आहे. इतर गुंतवणुकदार संस्थाचा या कंपनीतील वाटा 11.68 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x