3 December 2024 10:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Bonus Share News | शेअर प्राईस 20 रुपये! फ्री बोनस शेअर्स देतं आहे ही कंपनी, खरेदी करा मल्टिबॅगर शेअर

Bonus Share News

Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेड ही स्मॉल कॅप सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के अप्पर सर्किटसह 19.99 रुपये इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )

आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी पीव्हीव्ही इन्फ्रा स्टॉक 1.95 टक्के वाढीसह 20.38 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मात्र या कंपनीने गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी ‘रेकॉर्ड डेट’ जाहीर केलेली नाही.

मागील 2 आठवड्यात पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची किंमत 13.87 टक्के घसरली आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 253 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात पीव्हीव्ही इन्फ्रा स्टॉक तब्बल 76 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 35.82 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 10 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55.13 कोटी रुपये आहे.

मार्च 2024 तिमाहीपर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी आपला वाटा 26.65 टक्केपर्यंत वाढवला आहे. FII/FPI ने मार्च 2024 तिमाहीत शेअर होल्डिंग 1.00 टक्केवरून कमी करून 0.48 टक्केपर्यंत कमी केली आहे. मार्च 2024 तिमाहीत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली शेअरहोल्डिंग 1.00 टक्केवरून कमी करून 0.48 टक्के केली आहे. पीव्हीव्ही इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः पायाभूत सुविधा प्रदान करणारी कंपनी आहे.

पीव्हीव्ही इन्फ्रा ही कंपनी छतावर सौरऊर्जा पॅनेल बसविण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी संपूर्ण भारतात औद्योगिक, निवासी, व्यावसायिक आणि फ्लोटिंग सोलर रूफटॉप सिस्टीमच्या स्थापनेसाठी एंड-टू-एंड EPC सेवा आणि ऊर्जा व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या विविध रूफटॉप सोलर योजनांचा फायदा पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीला देखील होत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Share News on PVV Infra Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

Bonus Share News(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x