14 September 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Love and War Movie | 'लव्ह अँड वॉर' ला धडकणार किंग खानचा 'किंग', चित्रपटात झळकणार लग्नाच्या 'या' जोड्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 3 शेअर्स खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा - Marathi News Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय? BEL Share Price | BEL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 695% परतावा - Marathi News IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News
x

Tata Steel Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा स्टील शेअर्स BUY किंवा Hold करा, होईल मजबूत कमाई

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. अशा काळात ऑटो, फार्मा आणि पीएसयू सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मात्र मेटल इंडेक्समध्ये कमजोरी निर्माण झाली आहे. याचा फटका टाटा स्टील सारख्या दिग्गज कंपनीला होत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )

मागील तीन महिन्यात टाटा स्टील फक्त 4 टक्के वाढला आहे. मंगळवारी 9 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 172 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.18 टक्के घसरणीसह 168.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सध्या भारतीय शेअर बाजारात जून तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. याचा परिणाम टाटा स्टील कंपनीवर देखील पाहायला मिळत आहे. जर या कंपनीने सकारात्मक निकाल जाहीर केले तर हा स्टॉक वर जाऊ शकतो. मात्र वर जाण्यापूर्वी हा शेअर एकदा 160 रुपये किंमत स्पर्श करेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. टाटा स्टील ही कंपनी 35 दशलक्ष टन वार्षिक क्रूड स्टील उत्पादन क्षमता असलेली जगातील सर्वात मोठ्या पोलाद कंपन्यांपैकी एक आहे.

जून तिमाहीबाबत टाटा स्टील कंपनीने म्हंटले की, कंपनीच्या कच्च्या स्टीलच्या उत्पादनात जून 2023 मधील 5.02 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत 5.25 दशलक्ष टनांपर्यंत वाढ नोंदवली आहे. टाटा स्टील कंपनीची डिलिव्हरी 4.94 दशलक्ष टन नोंदवली गेली असून त्यात वार्षिक आधारावर 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने सर्वोत्तम विक्री नोंदवली आहे.

जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीच्या यूके युनिटने 0.68 दशलक्ष टन लिक्विड स्टीलचे उत्पादन केले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यात 19.99 टक्के घट झाली आहे. तर तिमाही आधारावर हे प्रमाण 3.03 टक्के अधिक नोंदवले गेले आहे. टाटा स्टील युके युनिटची डिलिव्हरी 0.69 दशलक्ष टन नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत 8.69 टक्के अधिक आहे. टाटा स्टील कंपनीने माहिती दिली की, त्यांनी पोर्ट टॅलबोटमधील ब्लास्ट फर्नेस-5 मधील ऑपरेशन्स बंद केले आहेत. या प्लांटमध्ये पूर्वी लिक्वीड स्टील तयार केले जात होते.

हॅन्सेक्स सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक पुढील काळात 160 रुपये किमतीवर येऊ शकतो. मात्र दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून जर स्टॉक होल्ड केला तर गुंतवणूकदारांना एका वर्षात 30 टक्क्यांपर्यंत परतावा सहज मिळेल. पुढील एका वर्षात टाटा स्टील स्टॉक 220 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 54 टक्के वाढवले आहेत. मागील दोन वर्षांत टाटा स्टील स्टॉक तब्बल 94 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

जून 2024 मध्ये टाटा स्टील कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 3.60 रुपये लाभांश वाटप केला होता. जून 2023 मध्येही या कंपनीने गुंतवणूकदारांना 3.60 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये स्टॉक स्प्लिट होण्यापूर्वी टाटा स्टील कंपनीने गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 51 रुपये लाभांश वाटप केला होता. टाटा स्टील कंपनीने 2022 मध्ये आपले शेअर्स 10:1 या प्रमाणात विभाजित केले होते. 2021 आणि 2020 मध्ये देखील टाटा स्टील कंपनीने प्रत्येक स्टॉकवर अनुक्रमे 25 रुपये आणि 10 रुपये लाभांश वाटप केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x