21 November 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, यापूर्वी दिला 820% परतावा

Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | भारतातील आघाडीची पवन ऊर्जा कंपनी आयनॉक्स विंडला राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आयनॉक्स विंड कंपनी या दोन्ही राज्यांमध्ये 200 मेगावॅट क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. ही ऑर्डर आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या नवीनतम 3 मेगावॅट क्षमतेच्या विंड टर्बाइन जनरेटरसाठी देण्यात आली आहे. यासह कंपनीला एंड-टू-एंड टर्नकी अंमलबजावणीचे काम देखील देण्यात आले आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

ही बातमी येताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आयनॉक्स विंड स्टॉकचे कंपनीच्या शेअर्सचे कव्हरेज सुरू केले आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 156.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयनॉक्स विंड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, “आमचा विश्वास आहे की, सध्याची ऑर्डर बुक आणि मजबूत ऑर्डर पाइपलाइनच्या आधारावर आर्थिक वर्ष 2024-25 आणि त्यापुढील काळात कंपनीची कामगिरी सुधारणार आहे. यासह कंपनीच्या व्यावसायिक वचनबद्धतेला देखील बळकटी मिळणार आहे”. कंपनीने नुकताच आपल्या एका निवेदनात म्हटले होते की, आयनॉक्स विंड कंपनी लवकरच कर्जमुक्त होणार आहे. यासह कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणाही केली आहे. आयनॉक्स विंड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.

आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 820 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने 15 टक्क्यांची वाढ नोंदवली होती. नुकताच या कंपनीने आपल्या प्रवर्तकांकडून ब्लॉक डीलद्वारे 900 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. 2024 या वर्षात आयनॉक्स विंड स्टॉक फक्त 20 टक्के वाढला आहे. कर्जमुक्त होण्याची बातमी आयनॉक्स विंड स्टॉकसाठी मजबूत ट्रिगर ठरला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x