22 November 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मल्टिबॅगर परतावा

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 28.80 रुपये किमतीवर पोहचले होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने आपले सर्व थकीत कर्जे परतफेड केले आहेत. या कंपनीवर सुमारे 800 कोटी रुपये कर्जे होते. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.92 टक्के घसरणीसह 27.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर स्टॉक पुढील काळात 34 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्या रिलायन्स पॉवर स्टॉक 30 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. पाच वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स पॉवर स्टॉक सध्या S&P BSE Small Cap इंडेक्सचा भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11,295.72 कोटी रुपये आहे.

मागील एका महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12.6 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 17.54 टक्के वाढला आहे. मागील दोन वर्षांत, तीन वर्षांत आणि पाच वर्षांत रिलायन्स पॉवर स्टॉकची किंमत अनुक्रमे 147 टक्के, 99 टक्के आणि 595 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच हा स्टॉक आपल्या नीचांक किमतीच्या तुलनेत 2700 टक्के मजबूत झाला आहे.

रिलायन्स पॉवर ही कंपनी पूर्वी रिलायन्स एनर्जी जनरेशन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. रिलायन्स पॉवर ही कंपनी मुख्यतः भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ऊर्जा प्रकल्प विकसित करणे, बांधकाम करणे, ऑपरेट करणे आणि देखरेख करण्याचे काम करते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी तसेच रिलायन्स एडीए गृप रिलायन्स पॉवर कंपनीला व्यावसायिक पातळीवर आधार देण्याचा काम करतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x