23 November 2024 8:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

RVNL Share Price | संधी सोडू नका! बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार हा शेअर, 5 दिवसात दिला 40% परतावा

RVNL Share Price

RVNL Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. यामधे आरव्हीएनएल स्टॉक देखील सामील होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

मागील काही दिवसापासून आरव्हीएनएल स्टॉक मजबूत तेजीत धावत आहे. आज देखील या स्टॉकने हिरव्या निशाणीवर ओपनिंग केली आहे. बुधवारी आरव्हीएनएल स्टॉक 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 598 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.82 टक्के वाढीसह 627.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका आठवड्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 125 टक्क्यांनी वाढली आहे. बुधवारी दिसवभरात NSE इंडेक्सवर या कंपनीचे 13,09,48,695 शेअर्स ट्रेड झाले होते. तर BSE इंडेक्सवर 1,18,74,764 शेअर्स ट्रेड झाले होते.

आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने 202.87 कोटी रुपये मूल्य असलेल्या दक्षिण पूर्व रेल्वेचा कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. यासह आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने देखील उन्नत मेट्रो स्थानकांच्या बांधकामासाठी 187.34 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. मागील आठवड्यात आरव्हीएनएल कंपनीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भारत आणि परदेशातील आगामी प्रकल्पांसाठी सहकार्य करार केला आहे.

अनेक ऑर्डरची प्राप्ती आणि DMRC सह झालेला करार हे घटक आरव्हीएनएल स्टॉकसाठी ट्रिगर ठरले आहेत. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे पायाभूत सुविधांबाबत मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे आरव्हीएनएल स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत. वार्षिक आधारावर आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये 222 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 380 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात, तीन वर्षात आणि पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत अनुक्रमे 1793 टक्के, 1728.50 टक्के, 2144.5 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x