23 November 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Ramchandra Leasing Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 52 पैसे! पटापट पैसे दुप्पट करतोय हा शेअर, खरेदी करणार?

Ramchandra Leasing Share Price

Ramchandra Leasing Share Price | रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या या पेनी स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहे. मंगळवारी रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स कंपनीचे शेअर 4.79 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ( रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स कंपनी अंश )

आज मात्र या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स स्टॉक 5.00 टक्के घसरून 1.52 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.06 रुपयेवरून वाढून 1.53 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 44.34 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर सध्याच्या किमतीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.44 लाख रुपये झाले असते. म्हणजेच तुम्हाला एका लाखावर 44340 रुपये नफा मिळाला असता.

मागील एका वर्षात रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट केले आहेत. एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.74 पैसे होती. मागील एका वर्षात हा स्टॉक तब्बल 107 टक्के वाढला आहे. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.07 लाख रुपये झाले असते.

मागील 5 वर्षांत रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 500 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 565 टक्के वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 0.23 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.65 लाख रुपये झाले असते.

रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स ही कंपनी मुख्यतः लीजिंग आणि फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करते. याशिवाय ही कंपनी आपल्या ग्राहकांना वाहन आणि वैयक्तिक कर्ज सुविधा देखील प्रदान करते. या कंपनीची स्थापना 1993 साली गुजरातमध्ये झाली होती. या कंपनीचे बाजार भांडवल 7.83 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ramchandra Leasing Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

Ramchandra Leasing Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x