23 November 2024 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, ऑर्डरबुक मजबूत होताच स्टॉक तेजीत

MRPL Share Price

MRPL Share Price | एमआरपीएल कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत व्यवहार करत आहेत. नुकताच मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीने वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन उपकरणे निर्मात्या GE पॉवर इंडिया कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आले होते. ( मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

जीई पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारी 15 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर पोहचला होता. 14 जुलै 2023 रोजी एमआरपीएल कंपनीचे शेअर्स 154.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी जीई पॉवर स्टॉक 5.87 टक्के वाढीसह 632.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. तर MRPL कंपनीचे शेअर्स आज 5.32 टक्के वाढीसह 242 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

GE पॉवर कंपनीचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 83.4 अंकावर आहे. यावरून कळते की हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. या कंपनीच्या स्टॉकचा बीटा 1.1 आहे, जो एका वर्षात उच्च अस्थिरता दर्शवतो. GE पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.

GE पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 269.62 टक्के मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. गेल्या दोन वर्षात या कंपनीचे शेअर्स 259 टक्के मजबूत झाले आहेत. नुकताच एमआरपीएल कंपनीने जीई पॉवर कंपनीला मुख्य टर्बाइन स्पेअर्सच्या पुरवठ्याशी संबंधित ऑर्डर दिली होती, त्यानंतर या दोन्ही कंपनीचे शेअर्स चर्चेत आले होते.

एमआरपीएल कंपनीने जीई पॉवर कंपनीला दिलेल्या ऑर्डरचे मूल्य 7.66 कोटी रुपये आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 18 महिन्यात करायची आहे. GE पॉवर इंडिया कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 25.94 कोटी रुपये एकत्रित निव्वळ नफा कामाला होता. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीला 129.70 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मार्च 2023 तिमाहीत या कंपनीने 359.43 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो मार्च 2024 तिमाहीत 469.89 कोटी रुपयेवर पोहचला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत जीई पॉवर कंपनीचे ऑर्डर अनुशेष 3,309 कोटी रुपये होते. तर मार्च 2023 मध्ये हे प्रमाण 3,615.3 कोटी रुपये होते. ज्यात वार्षिक आधारावर 8.5 टक्क्यांची घट झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MRPL Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

MRPL Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x