23 November 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर ब्रेकआऊट देणार, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल मजबूत परतावा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 17.26 टक्क्यांच्या वाढीसह 289.45 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 16.20 टक्के वाढीसह 286.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयआरईडीए कंपनी अंश )

आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 174.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.60 टक्के वाढीसह 285.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

वेल्थमिल्स सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर शेअर फोकसमध्ये आले होते. या कंपनीचा IPO नोव्हेंबर 2023 मध्ये अवघ्या 32 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता. आता हा स्टॉक 300 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. सध्या या कंपनीच्या शेअर्समध्ये तात्पुरती अस्थिता निर्माण झाली आहे, कारण कंपनी आज 12 जुलै रोजी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 254 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तसेच या स्टॉकला 290 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते जर या स्टॉकने ब्रेकआऊट दिला तर शेअरची किंमत 300 रुपये किमतीवर जाऊ शकते. या शेअरची संभाव्य मासिक ट्रेडिंग रेंज 250 रुपये ते 300 रुपये दरम्यान असेल.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे 1.48 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा 82.01 लाख या दोन आठवड्यांच्या सरासरी ट्रेडिंग व्हॉल्युमच्या तुलनेत अधिक आहे. या स्टॉकमध्ये एका दिवसात तब्बल 391.60 कोटी रुपयेची उलाढाल झाली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 77,044.78 कोटी रुपये आहे. आयआरईडीए ही कंपनी मुख्यतः नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी आणि उपकरणे, उत्पादन आणि प्रसारण यांसारख्या संबंधित क्रियाकलापांसाठी वित्तीय सेवा करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 12 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x