SJVN Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार SJVN शेअर, म्युच्युअल फंड कंपनी आणि LIC कडून जोरदार खरेदी
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 6.1 टक्के वाढीसह 151.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने जून तिमाहीत आपला एसजेव्हीएन कंपनीतील हिस्सा 2.26 टक्केपर्यंत वाढवला आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
मार्च 2024 तिमाहीपर्यंत एलआयसीने एसजेव्हीएन कंपनीचे 1.73 टक्के भाग भांडवल धारण केले होते. लेटेस्ट शेअरहोल्डिंग डेटानुसार एसजेव्हीएन कंपनमधील किरकोळ भागधारकांची संख्या तीन महिन्यांत 12 लाखांपर्यंत वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 1.84 टक्के वाढीसह 152.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जून 2024 तिमाहीच्या अखेरीस अनेक भारतीय म्युच्युअल फंड कंपन्यांनी एसजेव्हीएन कंपनीतील आपला वाटा 1.56 टक्केपर्यंत वाढवला आहे. मार्च 2024 तिमाहीपर्यंत म्युचुअल फंड कंपन्यांचा एसजेव्हीएन स्टॉकमधील वाटा 1.54 टक्के होता. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा एसजेव्हीएन कंपनीतील वाटा स्थिर आहे. भारत सरकारने देखील एसजेव्हीएन कंपनीचे 81.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
एसजेव्हीएन कंपनीच्या स्टॉकचा RSI इंडेक्स 61.7 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. या कंपनीचा स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.6 आहे, जो या कालावधीत खूप उच्च अस्थिरता दर्शवतो. एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. 2024 यावर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SJVN Share Price NSE Live 12 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल