22 November 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Lorenzini Apparels Share Price | 27 रुपयाच्या शेअर गुंतवणूकदार तुटून पडले, यापूर्वी दिला 6563% परतावा

Lorenzini Apparels Share Price

Lorenzini Apparels Share Price | लॉरेन्झिनी अॅपेरेल्स कंपनीचे शेअर्स तेजीत सुरू असलेल्या व्यवहारामुळे चर्चेत आले आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 25.32 रुपये या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. तर आज या स्टॉकने 10 टक्के अप्पर सर्किट हीट केला आहे. मागील चार वर्षात लरिन्झिनी ॲपेरल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6563 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( लॉरेन्झिनी अॅपेरेल्स कंपनी अंश )

जुलै 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 0.38 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या जवळ पोहचला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी लॉरेन्झिनी अॅपेरेल्स स्टॉक 9.99 टक्के वाढीसह 27.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जुलै 2021 मध्ये लॉरेन्झिनी अॅपेरेल्स कंपनीचे शेअर्स 0.45 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

2021 ते 2024 या काळात लॉरेन्झिनी अॅपेरेल्स स्टॉक तब्बल 5526 टक्के वाढला होता. जुलै महिन्यात लॉरेन्झिनी अॅपेरेल्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 11 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. जून 2024 मध्ये हा स्टॉक 8 टक्के, मे महिन्यात 2 टक्के, एप्रिल महिन्यात 7 टक्के आणि मार्च 2024 मध्ये 10.4 टक्के घसरला होता. जानेवारी 2024 या एका महिन्यात लॉरेन्झिनी अॅपेरेल्स स्टॉक 63 टक्क्यांनी वाढला होता. तर फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 19 टक्क्यांनी वाढला होता. 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.09 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 124 टक्क्यांनी वाढले आहेत. लॉरेन्झिनी अॅपेरेल्स ही कंपनी भारतात तयार कपडे डिझाइन करण्याचा, उत्पादन करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी मॉन्टेल या ब्रँड नावाखाली पुरुष आणि महिलांसाठी विविध डिझायनर तयार कपडे तयार करते. ही कंपनी आपल्या रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे ग्राहकांना सेवा देते. या कंपनीची स्थापना 2007 साली नवी दिल्लीमध्ये झाली होती.

मार्च 2024 तिमाहीत लॉरेन्झिनी अॅपेरेल्स कंपनीने 27.37 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा नफा 7.17 लाख रुपये होता. ज्यात वार्षिक आधारावर 282 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीला 52 लाख रुपये तोटा सहन करावा लागला होता. मार्च 2024 तिमाहीत लॉरेन्झिनी अॅपेरेल्स कंपनीने 554.6 लाख रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा महसूल 263 लाख रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 277.6 लाख रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Lorenzini Apparels Share Price NSE Live 12 July 2024.

हॅशटॅग्स

Lorenzini Apparels Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x