14 September 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 3 शेअर्स खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा - Marathi News Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय? BEL Share Price | BEL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 695% परतावा - Marathi News IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News
x

IRB Infra Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार IRB इन्फ्रा शेअर, पुढे मल्टिबॅगर रिटर्न मिळण्याचे संकेत

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 2.40 टक्क्यांच्या वाढीसह 69.79 रुपये किमतीवर पोहचला होता. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच जून तिमाहीतील टोल महसूल संकलनाचे आकडे जाहीर केले आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये, कंपनीने माहिती दिली आहे की, जून 2024 तिमाहीत कंपनीच्या टोल महसूल संकलनात 35 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 68.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 1,556 कोटी रुपये टोल वसुली केली होती. तर जून 2023 तिमाहीत या कंपनीने 1,183 कोटी रुपये टोल वसुली केली होती. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या टोल वसुलीत 32 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, “आम्ही नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची जोरदार सुरुवात केली आहे. जून 2024 तिमाहीत कंपनीने टोल वसुलीत जोरदार वाढ नोंदवली आहे. टॅरिफ रिव्हिजनच्या अंमलबजावणीमुळे कंपनीच्या टोल संकलनात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तसेच हा सकारात्मक कल आर्थिक वर्ष 2024-25 च्या आगामी तिमाहीतही पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड ही एकात्मिक मल्टी-नॅशनल ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर कंपनी आहे. ही कंपनी रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात एक्स्पर्ट मानली जाते. आयआरबी इन्फ्रा कंपनीने देशभरात 18,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले असून, त्यावर केलेली टोल उभारणी, ऑपरेट करणे आणि त्यांचे देखभाल करणे यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सध्या ही कंपनी देशभरात 15,500 लेन किलोमीटर लांबीचा रस्ते व्यवस्थापन करत आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा टोल-ऑपरेट-हस्तांतरण क्षेत्रात 38 टक्के वाटा आहे. तसेच या कंपनीने भारताच्या उत्तर-दक्षिण महामार्ग कनेक्टिव्हिटीमध्ये 12 टक्के वाटा काबीज केला आहे. IRB समूहाच्या प्रोजेक्ट पोर्टफोलिओमध्ये सध्या 26 रस्ते प्रकल्प सामील आहेत. यामधे 18 बिल्ड-ऑपरेट-हस्तांतरण, 4 TOT, आणि 4 हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल प्रकल्प सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x