14 September 2024 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Love and War Movie | 'लव्ह अँड वॉर' ला धडकणार किंग खानचा 'किंग', चित्रपटात झळकणार लग्नाच्या 'या' जोड्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 3 शेअर्स खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा - Marathi News Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय? BEL Share Price | BEL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 695% परतावा - Marathi News IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News
x

Jio Finance Share Price | शॉर्ट टर्म मध्ये 50% परतावा देणारा जिओ फायनान्शियल शेअर सुसाट तेजीत येणार

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 1 टक्के वाढीसह ओपन झाला होता. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळू शकते. कारण नुकताच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला नॉन-बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस ऐवजी कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा दर्जा दिला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )

नोव्हेंबर 2023 मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीला RBI ने NBFC मधून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीत रुपांतर करण्यास मान्यता दिली होती. याबाबत कंपनीने 21 नोव्हेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजेला अपडेट कळवली होती. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 0.79 टक्के वाढीसह 350.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा दर्जा मिळण्यासाठी त्या कंपनीची मूळ मालमत्ता 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी लागते. 20 डिसेंबर 2016 रोजी आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कंपनीच्या शेअर्स आणि सिक्युरिटीजचे अधिग्रहण करणे हे CIC च्या कामाचा एक भाग आहे. CIC ला त्याच्या निव्वळ मालमत्तेपैकी किमान 90 टक्के इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, बाँड्स, डिबेंचर्स, डेट किंवा ग्रुप कंपन्यांमध्ये कर्ज या स्वरूपात गुंतवणूक करून ठेवणे आवश्यक आहे.

100 कोटीं रुपयेपेक्षा जास्त मालमत्ता असलेल्या सर्व CIC ला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीतून डिमर्जर झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने CIC चा दर्जा मिळावा यासाठी RBI कडे अर्ज सादर केला होता. 2024 यावर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या शेअर बाजारातील गुंतवणुकदार आणि तज्ञांच्या नजरा रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या जून तिमाहीच्या निकालावर लागले आहेत. ही कंपनी पुढील आठवड्यात म्हणजेच शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x