23 November 2024 2:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीबाबत मोठी अपडेट, थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीबाबत एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच RBI ने रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिस कंपनीला नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीतून कोअर इंवेस्टमेंट कंपनी म्हणून रूपांतरित करण्याची परवानगी दिली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने RBI कडे NBFC मधून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत RBI ने हिरवा सिग्नल दिला आहे. ( जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश )

मागील आठवड्यात शुक्रवारी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 350.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिस स्टॉक 0.44 टक्के वाढीसह 351.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील सहा महिन्यांत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील वर्षी जुलै 2023 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपमधून वेगळे करण्यात आले होते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 2.23 लाख कोटी रुपये आहे. सध्या कंपनीची कामगिरी पासून तज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये जिओ फायनान्शिअल सर्व्हिस कंपनीने 638.06 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यापैकी कंपनीचा नफा 382.47 कोटी रुपये होता.

मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 140.51 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यापैकी कंपनीचा निव्वळ नफा 77.76 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2023-2024 साठी कंपनीचा EPS 0.12 रुपये प्रति शेअर नोंदवला गेला होता. सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीवर चर्चा केली जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x