22 November 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IRFC Share Price | IRFC शेअरने दिला ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरएफसी स्टॉक 5 टक्के वाढीसह 216.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 224.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. तर आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 2.10 टक्के वाढीसह 221.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून रेल्वे संबंधित अनेक मोठ्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पापूर्वीच रेल्वे कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले आहेत. शेअरखान फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरएफसी स्टॉकने 195 रुपये ते 215 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 230-232 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

मागील एका आठवड्यात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे. मागील तीन आठवड्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा दिला आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी स्टॉकने लोकांना 117 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 560 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील दोन वर्षांत IRFC कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 980 टक्क्यांनी वाढवले आहेत. 2023 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा लाभांश वाटप केला होता. 2022 मध्येही या रेल्वे कंपनीने गुंतवणुकदारांना दोन वेळा लाभांश वाटप केला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,82,606.44 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x