RVNL Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा PSU शेअर, मागील 3 महिन्यात झाली 151% कमाई
RVNL Share Price| आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासुन जोरदार तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली सुरू झाली आहे. मागील एका महिन्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 637 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
दिवसभरात या कंपनीच्या शेअरने 647 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या सिंपल मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.27 टक्के घसरणीसह 624.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, आगामी अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद असण्याची अपेक्षा आहे. तसेच मागील काही आठवड्यात या कंपनीने अनेक नवीन ऑर्डर्स जिंकल्या आहेत. मागील आठवड्यात आरव्हीएनएल कंपनीने मध्य रेल्वेकडून 1×25 KV इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीमच्या ओव्हरहेड मॉडिफिकेशन कामात सुधारणा करण्याचे काम मिळाले असल्याची माहिती दिली आहे. या प्रोजेक्टचे एकूण मुल्य 132.59 कोटी रुपये आहे.
आरव्हीएनएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. यासह कंपनीला एकामागून एक अनेक ऑर्डर मिळत आहेत. कंपनीची व्यावसायिक मूलभूत तत्त्वे देखील मजबूत आहेत. तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल स्टॉकने 580 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, जर या स्टॉकने ब्रेकआऊट दिला तर अल्पावधीत शेअरची किंमत 700-725 रुपये किमतीवर जाऊ शकते.
मागील दोन आठवड्यात आरव्हीएनएल स्टॉक तब्बल 52 टक्क्यांनी वाढला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 151 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 186 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 250 टक्क्यांनी वाढली आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 428 टक्के वाढवले आहेत. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1,970 टक्क्यांनी मजबूत झाली. आरव्हीएनएल ही सरकारी कंपनी मुख्यतः रेल्वेचे नवीन लाईन बांधणे, दुहेरीकरण, गेज रूपांतरण, रेल्वे विद्युतीकरण, मेट्रो प्रकल्प, कार्यशाळा, पूल, केबल पूल, इमारती इत्यादींसह सर्व प्रकारच्या रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 16 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA