27 November 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीचे, खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 1450% परतावा - NSE: JPPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK SIP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची योजना, 2500 रुपयांची मासिक SIP देईल 1.18 करोड रुपये परतावा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, 32% कमाई होईल, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल
x

Tanla Share Price | मल्टिबॅगर तानला शेअरबाबत फायद्याची अपडेट, खरेदीला गर्दी, 2 दिवसात 15% परतावा दिला

Tanla Share Price

Tanla Share Price | तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीच्या WhatsApp सोबत एक करार केला आहे. त्यामुळे तानला प्लॅटफॉर्म स्टॉक तेजीत आला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 1,080 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( तानला प्लॅटफॉर्म कंपनी अंश )

सोमवारी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 976 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 1086.05 रुपये किमतीवर पोहचला होता. म्हणजेच एका दिवसात तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के वाढली होती. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 1,011.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1500 टक्के वाढली आहे. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या स्टॉकचा RSI सध्या 54.8 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही.

तानला प्लॅटफॉर्म स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या सिंपल मुविंग एव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. व्हॉट्सअँप आणि तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या कराराचा उद्देश बनावट फोन नंबर ओळखून टेक कंपनीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील घोटाळ्यांना आळा घालणे हा आहे.

व्हॉट्सअॅपने त्यांच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांना आला घालण्यासाठी तानला प्लॅटफॉर्म कंपनीसोबत हा करार केला आहे. टेक्स्ट मेसेज आणि व्हॉईस कॉलिंग सेवा देणारे बँकिंग आणि दूरसंचार प्लॅटफॉर्म व्हॉट्सअँप सोबत डेटा आदानप्रदान करून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आर्थिक फसवणूकीला बंदी घालू शकतात.

या करारानुसार तानला प्लॅटफॉर्म कंपनीने तयार केलेला Wisely ATP हा AI आधारित अँटी-फिशिंग प्लॅटफॉर्म फसवणुकीसाठी वापरल्या जाणारे 10 अंकी मोबाईल क्रमांक आणि मलेसियस URL ची माहिती गोळा करणार आहे. आणि या सिस्टीमच्या माध्यमातून फसवणुकीच्या स्वरूपाबाबत WhatsApp ला रिअल-टाइम सिग्नल शेअर करणार आहे. WhatsApp या संबधित डेटावर प्रक्रिया करून त्यांना सिस्टममधून बाहेर करण्याचे काम करणार आहे. भारतीय दूरसंचार नियामकाच्या निर्देशांनुसार टेलीकॉम कंपन्यांना संशयास्पद एसएमएस पाठवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी AI मशीन लर्निंग उपाय लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tanla Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

Tanla Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x