18 September 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan Guarantor Alert | लोन गॅरेंटर बनण्याचा मित्रपणा अंगाशी येऊ शकतो; अशा पद्धतीने एक्सिट घ्या - Marathi News My EPF Money | पगारदारांनो, सॅलरीतून योगदान छोटे पण कमाई 5 कोटींची होईल, असा घ्या EPF चा फायदा - Marathi News Penny Stocks | शेअर असावा तर असा, 1 वर्षात गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 53000% परतावा - Marathi News Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, फायदा घ्या - Marathi News Vodafone Idea Share Price | पेनी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक चार्टने दिले संकेत, BUY करावा की Sell? - Marathi News Post Office Scheme | महिलांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, सर्वात मोठा व्याजदर, बचतीवर मिळेल लाखोत परतावा - Marathi News
x

HCL Share Price | एचसीएल टेक स्टॉकची रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस कमाई करून देणार

HCL Share Price

HCL Share Price | एचसीएल टेक कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच विविध ब्रोकरेज हाऊसेसने कंपनीच्या स्टॉकची टारगेट प्राइस आणि रेटिंग वाढवली आहे. तज्ञांनी एचसीएल स्टॉकची रेटिंग BUY वरून अपग्रेड करून Outperform केली आहे. नोमुरा फर्मच्या तज्ञांनी एचसीएल टेक स्टॉकवर BUY रेटिंग जाहीर करून 1720 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ( एचसीएल टेक कंपनी अंश )

Macquarie फर्मच्या तज्ञांनी एचसीएल टेक स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर करून 1800 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मॉर्गन स्टॅन्ले फर्मने एचसीएल टेक स्टॉकची रेटिंग ओव्हरवेट करून टार्गेट प्राइस 1705 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी एचसीएल टेक स्टॉक 0.092 टक्के घसरणीसह 1,568.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जून 2024 तिमाहीत एचसीएल टेक कंपनीचा निव्वळ नफा 20.4 टक्क्यांच्या वाढीसह 4,257 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षात महसुल संकलनात तीन ते पाच टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. जून 2024 तिमाहीत एचसीएल टेक कंपनीने 28,057 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसूल संकलनात 6.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एचसीएल टेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी विजयकुमार यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, जून 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल आणि EBITDA कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. कंपनीला विश्वास आहे की, पुढील तिमाहींमध्ये देखील कंपनीची आर्थिक कामगिरी मजबूत राहणार आहे. कंपनी आपल्या क्रिएटिव्ह एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानावर खर्च करून अधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत राहणार आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

HCL Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x