28 November 2024 4:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
x

Zen Technologies Share Price | 5 वर्षात 2300% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मालामाल करणार

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सोमवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 1362 रुपये किमतीवर पोहचले होते. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीने एआय पॉवर्ड रोबोट्स आणि 4 संरक्षण उत्पादने लाँच केली आहेत. झेन टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः अँटी ड्रोन तंत्रज्ञान आणि संरक्षण प्रशिक्षण उपाय प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1487 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 573.95 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 0.70 टक्के घसरणीसह 1,351.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

झेन टेक्नॉलॉजी कंपनीने आपली नवीन उत्पादने AI Touring Technologies च्या सहयोगाने जागतिक संरक्षण बाजारासाठी लाँच केली आहेत. जागतिक सुरक्षेसाठी झेन टेक्नॉलॉजी कंपनीने HawkEye, Barbaric-URCWS म्हणजेच अल्ट्रालाइट रिमोट कंट्रोल वेपन स्टेशन, प्रहस्थ आणि स्टिर स्टॅब-640 यासारखे उत्पादन लाँच केले आहे. मागील 6 महिन्यांत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 762 रुपयेवरून वाढून 1362 रुपये किमतीवर पोहचले होते.

मागील 5 वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2300 टक्के नफा कमावून दिला आहे. 19 जुलै 2019 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 55.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1362 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 2 वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 707 टक्के वाढवले आहेत.

15 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 168.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 1362 रुपये किमतीवर पोहोचला आहे. मागील एका वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सची किंमत 124 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 2 महिन्यांपूर्वी झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 42 टक्केपेक्षा जास्त वाढले आहेत. या काळात हा स्टॉक 956 रुपयेवरून 1360 रुपये किमतीवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x