13 September 2024 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News EPF On Salary | पगारदारांसाठी खुशखबर! 50 हजाराच्या पगारावर EPF अकाउंटमध्ये 2.53 करोड रुपये जमा होणार - Marathi News HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL सहित या 5 डिफेन्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा NBCC Share Price | 229% मल्टिबॅगर परतावा देणारा NBCC शेअर खरेदी करा, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Senior Citizen Saving Scheme | योग्य ठिकाणी पैसे गुंतवा आणि दरमहा कमवा 20,000; योजनेची पूर्ण डिटेल्स - Marathi News IREDA Share Price | PSU शेअर मालामाल करणार, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News Smart Investment | लेकीसाठी गुंतवा फक्त रु.10,000; परतावा रक्कम मिळेल 55.61 लाख रुपये, आजच फॉर्म भरा - Marathi News
x

NHPC Share Price | कमाईची मोठी संधी! NHPC स्टॉक चार्टवर तेजीचे मोठे संकेत, फायदाच फायदा होणार

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने एनएचपीसी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील 3 महिन्यांत 132 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( एनएचपीसी कंपनी अंश )

परकीय गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, मान्सूनची हालचाल आणि जून तिमाहीचे निकाल यामुळे भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी निर्माण झाली आहे. अशा काळात एनएचपीसी या नवरत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 240 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.

आज मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 1.84 टक्के घसरणीसह 113.68 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ICICI Direct फर्मने एनएचपीसी स्टॉकवर 132 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 102 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. 12 जुलै रोजी या कंपनीचे शेअर 0.92 टक्क्यांच्या घसरणीसह 113 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक गुंतवणुकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो.

मागील सहा महिन्यांत, एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सने टेक्निकल चार्टवर कप अँड हैंडल पॅटर्न तयार केला आहे. हा पॅटर्न शेअरमधील स्ट्रक्चरल अपट्रेंड दर्शवितो. नोव्हेंबर 2023 पासून हा स्टॉक आपल्या 50 दिवसांच्या EMA पातळीवर ट्रेड करत आहे. मागील एका आठवड्यात एनएचपीसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 9 टक्के वाढली आहे. तर मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात एनएचपीसी स्टॉक 10 टक्के, तीन महिन्यांत 22 टक्के आणि सहा महिन्यांत 63 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 2024 या वर्षात एनएचपीसी स्टॉक 70 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी एनएचपीसी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 140 टक्के वाढले असते.

मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 242 टक्के वाढली आहे. मागील तीन वर्षांत एनएचपीसी स्टॉक तब्बल 335 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 117.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 44.87 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,13,508.89 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NHPC Share Price NSE Live 16 July 2024.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x