28 November 2024 11:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Open Try And Buy | ॲमेझॉनच्या 'या' जबरदस्त सर्विसमुळे केवळ 149 रुपयात घरी येईल OnePlus Open मोबाईल Salary Calculator | बचतीचा महामंत्र, 1 लाख पगार असून सुद्धा बचत होत नाही; मग पगार हातात आल्याबरोबर ही एक गोष्ट करा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, अशी कमाईची संधी सोडू नका - SGX Nifty Railway Ticket Booking | अरेच्चा, चुकीच्या तारखेला तिकीट बुक झालं चिंता नको, या सोप्या पद्धतीने बदला तिकिटाची तारीख BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, जेफरीज ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला, तेजीचे संकेत - SGX Nifty NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty
x

Ashok Leyland Share Price | आता थांबणार नाही! कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तुफान तेजीत मिळणार परतावा

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड या वाहन निर्मात्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 228.50 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचले होते. नुकताच अशोक लेलँड लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 2,104 बसेसची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 982 कोटी रुपये आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )

हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या अशोक लेलँड कंपनीने ही ऑर्डर जिंकल्याने कंपनीच्या कामगिरीत आणखी सुधारणा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने अशोक लेलँड कंपनीला दिलेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी अशोक लेलँड स्टॉक 0.48 टक्के वाढीसह 229.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

या आर्डरची पूर्तता करण्यासाठी अशोक लेलँड कंपनी या सर्व बसेसची बॉडी आपल्या विशेष बस बॉडी प्लांटमध्ये तयार करणार आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, ही ऑर्डर अत्यंत कार्यक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत उत्पादनांच्या निर्मितीसाठी आमची वचनबद्धता दर्शविते. यामुळे देशातील सार्वजनिक वाहतुक वाढीला चालना मिळणार आहे. अशोक लेलँड कंपनीला या नवीन ऑर्डरची पूर्तता पुढील 12 महिन्यांत करायची आहे.

2024 यावर्षात अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 22 टक्के मजबूत झाले आहेत. मागील 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत अशोक लेलँड स्टॉक 30 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 245.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 157.65 रुपये होती. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 66,656.90 कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत अशोक लेलँड कंपनीने निव्वळ नफ्यात 17 टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. कंपनीने मार्च तिमाहीत 933.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2022-23 च्या मार्च तिमाहीत अशोक लेलँड कंपनीने 799.87 कोटी नफा कमावला होता. 2022-23 च्या मार्च तिमाहीत अशोक लेलँड कंपनीने 13,229.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2024 तिमाहीत कंपनीचा महसूल 13,613.29 कोटी रुपयेवर पोहचला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अशोक लेलँड कंपनीने 45931.22 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 41,779.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashok Leyland Share Price NSE Live 17 July 2024.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x