20 September 2024 1:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Suzlon Share Price | संधी सोडू नका! सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर पॉझिटिव्ह परिणाम होणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मंगळवारी ब्लॉक डीलमुळे फोकसमध्ये आले होते. मंगळवारी हा स्टॉक 1.4 टक्के वाढीसह 55.40 रुपये किमतीवर पोहचला होता. या ब्लॉक डीलमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे 92 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या शेअर्सचे एकूण मूल्य 50 कोटी रुपये होते. सुझलॉन एनर्जी कंपनी 22 जुलै रोजी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल करणार आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

याच पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.01 टक्के वाढीसह 55.72 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

जेएम फायनान्शियल फर्मला विश्वास आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ महसूल वार्षिक आधारावर 36 टक्क्यांच्या वाढीसह 1,832.1 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. तसेच कंपनीचा EBITDA 38 टक्क्यांच्या वाढीसह 239.2 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, कंपनीचा एबिटा मार्जिन 13.1 टक्क्यांपर्यंत घसरू शकतो. वार्षिक आधारावर कंपनीचा PAT 61 टक्क्यांच्या वाढीसह 162.2 कोटी रुपयेवर येऊ शकतो.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक 44 टक्के वाढला आहे. मार्च 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.5 टक्के घसरली होती. त्यानंतर सलग चार महिने सुझलॉन एनर्जी स्टॉक मजबूत तेजीत वाढला होता. जानेवारी 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक तब्बल 201 टक्के वाढला होता.

ब्रोकरेज फर्म आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचा अंदाजित महसुल 2,413.66 कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 80 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, जून 2024 तिमाहीमध्ये कंपनीचा EBITDA मार्जिन 12.2 टक्केवर जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते, जून तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 283 कोटी रुपये निव्वळ नफा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला तोटा झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Suzlon Share Price today on 17 July 2024

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(217)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x