20 September 2024 4:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक देणार मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, कमाईची मोठी संधी

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीने देखील व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या एजीआर थकबाकी प्रकरणात कंपनीच्या याचिकेवर विचार करण्यास मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

जर सर्वोच्च न्यायालयाने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या बाजूने निर्णय दिला तर कंपनीच्या एजीआर थकबाकीत 30,000 कोटी रुपयेची घट होऊ शकते. आणि कंपनीचा AGR 35,000 कोटीवर येऊ शकतो. तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक पुढील काळात 23 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणेजच सध्याच्या किंमत पातळीपेक्षा हा स्टॉक 39 टक्क्यांनी वाढू शकतो. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.12 टक्के वाढीसह 16.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

व्होडाफोन आयडिया कंपनीचे अधिवक्ता हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की व्होडाफोन आयडिया कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेत कंपनीने न्यायालयाला कळवले होते की, कंपनीच्या गुंतवणूकदारांना एजीआर चा मुद्दा बंद करायचा आहे. हरीश साळवे यांनी न्यायालयाला सांगितले की कंपनीचे नवीन गुंतवणूकदार एजीआर थकबाकी प्रकरणात व्होडाफोन आयडिया कंपनीचे नेमके दायित्व किती आहे? याबाबत माहिती जाणून घेऊ इच्छित आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनीकडे भारत सरकारची 58,254 कोटी रुपये थकबाकी आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये दाखल केलेल्या आपल्या याचिकेत म्हटले होते की, कंपनी खूप मोठ्या आर्थिक संकटाचत अडकली आहे. त्यामुळे तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तथापि कंपनीने न्यायालयाला AGR वर तत्काळ दिलासा देण्याची विनंती केली आहे. मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 10 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 17 July 2024

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x