14 September 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 3 शेअर्स खरेदीचा सल्ला, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई करा - Marathi News Bigg Boss Marathi | निक्कीला मारलेली चापट आर्याला पडली महागात; भाऊंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष, आता पुढे काय? BEL Share Price | BEL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 695% परतावा - Marathi News IREDA Vs BHEL Share Price | IREDA, BHEL आणि येस बँक शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये, तेजीचे संकेत, नवीन अपडेट आली - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI फंडाच्या या 7 योजनांमध्ये डोळे झाकून बचत करा, 62% पर्यंत परतावा मिळेल - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची ब्रेकआऊट लेवल टेस्टिंग, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला - Marathi News
x

Garden Reach Shipbuilders Share Price | 1 वर्षात 321% परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, पुढेही मालामाल करणार

Garden Reach Shipbuilders Share Price

Garden Reach Shipbuilders Share Price | गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 840 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीला नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च संस्थेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीला महासागर संशोधन जहाजाचे बांधकाम आणि वितरण संबंधित काम देण्यात आले आहे. ( गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनी अंश )

कंपनीला या ऑर्डरची पूर्तता पुढील 42 महिन्यांत करायची आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 2560.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 3.16 टक्के वाढीसह 2,575 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका महिन्यात गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीने तीन ऑर्डर्स मिळवल्या आहेत. 1 जुलै रोजी कंपनीने माहिती दिली की, त्यांनी सागरी टग जहाज बांधण्यासाठी बांगलादेश सरकारसोबत एक करार केला आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 21 दशलक्ष डॉलर्स आहे. तसेच गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीने 4 बहुउद्देशीय जहाजांचे बांधकाम आणि वितरण करण्यासाठी करार केला आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 54 दशलक्ष डॉलर्स आहे.

मागील दोन वर्षांत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 993 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 234.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 16 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2560.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 321 टक्के परतावा कमावून दिला आहे.

17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 607.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2834.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 575 रुपये होती. मागील 6 महिन्यांत गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 190 टक्के वाढवले आहेत. 16 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 884.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 193 टक्के मजबूत झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Garden Reach Shipbuilders Share Price NSE Live 17 July 2024.

हॅशटॅग्स

Garden Reach Shipbuilders Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x