23 November 2024 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत तज्ज्ञांकडून अलर्ट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून तेजीत धावणाऱ्या आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मंगळवारी विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. सोमवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 9 टक्केपेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली होती. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

दरम्यान शेअरची किंमत 310 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचली होती. या कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाहीच्या मजबूत निकालामुळे तेजी निर्माण झाली होती. जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 383.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 6.02 टक्के घसरणीसह 272.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलने आयआरईडीए स्टॉकवर SELL रेटिंग देऊन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 130 रुपये किमतीवर येऊ शकतात. यापूर्वी तज्ञांनी आयआरईडीए स्टॉकची टारगेट प्राइस 110 रुपये निश्चित केली होती. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 310 रुपये या उच्चांक किमतीवरून 58 टक्के खाली येऊ शकतो.

जून 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 294.58 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल-जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न वाढून 1,501.71 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1,143.50 कोटी रुपये नोंदवले गेले होते. आयआरईडीए ही कंपनी ग्रीन एनर्जी फायनान्सिंगमध्ये भारतातील आघाडीची नॉन बैंकिंग फायनान्स कंपनी मानली जाते.

आर्थिक वर्ष 2024-25 च्या जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीची नॉन परफॉर्मिंग मालमत्ता 0.95 टक्क्यांवर आली होती. मागील वर्षी जून तिमाहीत हे प्रमाण 1.61 टक्केवर होते. 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत या कंपनीची निव्वळ संपत्ती 44.83 टक्क्यांच्या वाढीसह 9110.19 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीची संपत्ती 6,290.40 कोटी रुपये नोंदवली गेली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 17 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x