22 November 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IRB Share Price | संधी सोडू नका! IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

IRB Share Price

IRB Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 72 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे. मागील चार दिवसांपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )

मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 68.32 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर हा स्टॉक 5.5 टक्क्यांच्या वाढीसह 71.98 रुपये किमतीवर पोहचला होता. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 1.86 टक्के घसरणीसह 69.66 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने आयआरबी इन्फ्रा स्टॉकवर 84 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 66 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील वर्षभरात आयआरबी इन्फ्रा स्टॉकमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स देखील वाढत आहे.

आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रा स्टॉकने लक्षणीय ट्रेडिंग व्हॉल्यूमसह निर्णायक ब्रेकआउट दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 26 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के नफा कमावून दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर जून 2024 मध्ये या स्टॉकने 78.15 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 24.95 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

IRB Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x