22 November 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 6 दिवसात 30% घसरला, आता स्टॉक BUY, Sell की Hold करावा

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के खाली आली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 340 परतावा कमावून दिला आहे. या कंपनीची दीर्घकालीन कामगिरी पाहिली तर तुम्हाला समजेल की, कंपनीने गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली होती. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )

मात्र मागील एका आठवड्यात या स्टॉकमध्ये 23 टक्के घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 5.24 टक्के घसरणीसह 2.71 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची आर्थिक कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. या कंपनीने मागील चार तिमाहीत नफा कमावलेला नाही. मात्र तरीही एलआयसी सारख्या दिग्गज विमा कंपनीने या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. एवढेच नाही तर काही खाजगी बँकांनी हा स्टॉक मोठ्या प्रमाणात होल्ड करून ठेवला आहे.

मागील 5 वर्षात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे महसूल संकलन वार्षिक आधारावर 0.2 टक्के घटले आहे. मात्र शेअरची किंमत सरासरी वार्षिक 34 टक्के दराने वाढली आहे. साहजिकच शेअर कितीही तेजीत असला तरी तो महसूल वाढीचा निदर्शक नसतो. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची कमाई, महसूल आणि रोख प्रवाह यामध्ये लक्षणीय अशी उलाढाल पाह्यला मिळालेली नाही. मात्र तरीही भारतातील दिग्गज बँका आणि गुंतवणूक संस्थांनी या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, ही बाब अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3 रुपये पेक्षाही स्वस्त आहे.

मागील एका वर्षभरात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 258 टक्के परतावा कमावून दिला आहे. अलीकडच्या काळात या कंपनीच्या स्टॉकची कामगिरी सुधारली आहे. मागील एका महिन्यात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 20 टक्के वाढला होता. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 64 टक्के वाढली होती. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 18 July 2024

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x