22 November 2024 10:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Taparia Tools Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, पण परतावा मिळेल मल्टिबॅगर, खरेदी करणार?

Taparia Tools Share Price

Taparia Tools Share Price | टपारिया टूल्स कंपनीच्या शेअर्समध्ये अद्भुत तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 20 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 200 टक्के इतका लाभांश देणार आहे. ( टपारिया टूल्स कंपनी अंश )

यासाठी कंपनीने एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट म्हणून 22 जुलै हा दिवस निश्चित केला आहे. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी टपारिया टूल्स स्टॉक 4.91 टक्के वाढीसह 4.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मे महिन्यात टपारिया टूल्स कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक स्टॉकवर 20 रुपये म्हणजेच 200 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. तर आता पुन्हा एकदा या कंपनीने गुंतवणुकदारांना लाभांश देण्याचा विचार केला आहे. अनेकांना आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे, या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5 रुपयेपेक्षा स्वस्त आहे, मात्र कंपनी प्रत्येक तिमाहीत गुंतवणुकदारांना भरघोस लाभांश वाटप करत आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स धारण करणारे गुंतवणुकदार हा स्टॉक सहसा विकत नाही. आणि परिणामस्वरूप या स्टॉकमध्ये तरलता फार कमी आहे.

टपारिया टूल्स ही कंपनी हॅण्ड टूल्स निर्मिती व्यवसायात सक्रिय आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर 20 रुपये लाभांश वाटप केला होता. मार्च 2023 आणि जून 2023 मध्ये टपारिया टूल्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दोन वेळा प्रति शेअर 77.50 रुपये लाभांश वाटप केला होता. त्याच वर्षी जुलै 2023 मध्ये कंपनीने आपल्या शेअरधारकांना 4:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते.

2022 आणि 2021 मध्ये टपारिया टूल्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर अनुक्रमे 102.50 आणि 70 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6.48 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Taparia Tools Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

Taparia Tools Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x