22 November 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Rites Share Price | पटापट खरेदी करा हा मल्टिबॅगर शेअर, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा तेजी येणार

Rites Share Price

Rites Share Price | राईट्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला आसाम सरकारकडून एक नवीन ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स किंचित तेजीत आले होते. आज मात्र या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, आगामी अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळू शकते. ( राईट्स लिमिटेड कंपनी अंश )

नुकताच राईट्स लिमिटेड कंपनीला आसाम सरकारच्या सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विभागाकडून एक मोठा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी या कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 17,926 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी राईट्स लिमिटेड स्टॉक 1.97 टक्के घसरणीसह 728.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

राईट्स लिमिटेड कंपनीने 16 जुलै रोजी सेबीला माहिती दिली की, त्यांना आसाम सरकारच्या सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विभागाकडून 18 टक्के जीएसटीसह 50.18 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. GST वगळून या कॉन्ट्रॅक्टचे मूल्य 42.53 कोटी रुपये आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत राईट्स लिमिटेड कंपनीला आसाममधील 996.7 किमी लांबीच्या 47 रस्त्यांचे थर्ड पार्टी निरीक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी सल्लागार म्हणून सेवा प्रदान करण्याचे काम देण्यात आले आहे. आसाम सरकारने हा करार त्यांच्या आगामी आसाम माला 2.0 कार्यक्रमांची पूर्तता करण्यासाठी केला आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

राईट्स लिमिटेड कंपनीला कर्नाटक मायनिंग एन्व्हायर्नमेंट रिस्टोरेशन कॉर्पोरेशनकडून देखील 26.79 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डर अंतर्गत राईट्स लिमिटेड कंपनी बेल्लारी जिल्ह्यातील धर्मपुरा आणि सुशीलनगर येथे खाजगी रेल्वे मालवाहतूक टर्मिनल्सचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून सेवा प्रदान करणार आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

मागील दोन वर्षांत राईट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के नफा कमावून दिला आहे. राईट्स लिमिटेड कंपनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय करणारी नवरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 42 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 82 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात राईट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 215 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rites Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

#RITES Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x