22 November 2024 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

REC Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 50% परतावा, कमाईची संधी सोडू नका, फायद्याचा शेअर खरेदी करणार?

REC Share Price

REC Share Price | आरईसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. एप्रिल-जून 2024 या तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीमधील देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा वाटा किंचित घसरला आहे. मात्र किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा कंपनीतील वाटा वाढला आहे. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )

जून 2024 तिमाहीच्या अखेरीस जवळपास 38 देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी आरईसी लिमिटेड कंपनीचे 9.11 टक्के भाग भांडवल धारण केले होते. मार्च 2024 तिमाहीत त्यांचा वाटा 9.48 टक्के होता. यावरून कळते की म्युचुअल फंड संस्थांनी आपली शेअर होल्डींग कमी केली आहे. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 613.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जून 2024 तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स विकणाऱ्या म्युचुअल फंड संस्थामध्ये HDFC म्युच्युअल फंड ही प्रमुख कंपनी होती. जून 2024 तिमाहीच्या अखेरीस आरईसी लिमिटेड कंपनीमध्ये HDFC म्युचुअल फंड कंपनीने 1.63 टक्के भागभांडवल धारण केले होते. मार्च 2024 तिमाहीत त्यांचा वाटा 2.52 टक्के होता.

सध्या LIC कंपनीने देखील आरईसी लिमिटेड कंपनीचे 1.07 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. मार्च तिमाहीच्या अखेरीपर्यंत एलआयसी कंपनीचे नाव आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअरधारकांच्या यादीत नव्हते. म्हणजेच एलआयसी कंपनीने नुकताच आरईसी कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्च तिमाहीनंतर आरईसी लिमिटेड कंपनीतील आपला वाटा वाढवला आहे. मार्च 2024 मध्ये FII चा वाटा 19.92 टक्के होता, जो जून तिमाहीत 20.43 टक्केवर गेला आहे. जून 2024 तिमाहीत आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 16.5 टक्क्यांनी वाढली आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला होता.

मंगळवारी आरईसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 617.4 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.6 लाख कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. जुलै महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत आतापर्यंत 17 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | REC Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

REC share price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x