17 September 2024 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shraddha Arya | दिपीकानंतर अभिनेत्री श्रद्धा आर्यने दिली गूडन्यूज; बीचवरचा दोघांचा 'तो' व्हिडियो होतोय वायरल - Marathi News BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राइस नोट करा - Marathi News NMDC Share Price | झटपट कमाईची मोठी संधी, NMDC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, संधी सोडू नका - Marathi News Post Office Saving Scheme | 1 हजाराच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला सलग 5 वर्ष मिळतील रु.20000; फायदा घ्या - Marathi News Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट, स्टॉक रॉकेट स्पीडने देणार परतावा - Marathi News Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरची जादू, 1 वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 2.3 कोटी रुपये - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो! EPF बॅलेन्स चेक करण्यासाठी हे 4 मार्ग आहेत बेस्ट, घरबसल्या होईल काम - Marathi News
x

Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा ब्लॉक डीलमुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.4 टक्क्यांच्या वाढीसह 55.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वाढीचे कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीतील 0.08 टक्के म्हणजेच जवळपास 92 लाख शेअर्स एका दिवसात ट्रेड झाले होते. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

या शेअर्सचे एकूण मूल्य 50 कोटी रुपये होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने 22 जुलै रोजी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे. गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.98 टक्के घसरणीसह 55.33 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेएम फायनान्शियल फर्मचा विश्वास आहे की सुझलॉन एनर्जी कंपनीचा निव्वळ महसूल वार्षिक आधारावर 36 टक्क्यांच्या वाढीसह 1,832.1 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. यासह तज्ञांच्या मते, जून तिमाहीमध्ये कंपनीचा एबिटा 38 टक्क्याच्या वाढीसह 239.2 कोटी रुपये आणि एबिटा मार्जिन 13.1 टक्क्यांवर येऊ शकतो.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्क्यांनी वाढली होती. 2023 नंतर या कंपनीच्या शेअरची किंमत तिप्पट झाली आहे. 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 मध्ये या कंपनीचे 10 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 1.5 टक्के घसरल्यानंतर सलग चार महिने तेजीत वाढत होते. या वर्षी जानेवारी 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक एका महिन्यात तब्बल 201 टक्क्यांनी मजबूत झाला होता.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांनी देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी फर्मने सुझलॉन कंपनीची महसूल कमाई 2,413.66 कोटी रुपयेवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 80 टक्क्यांची वाढ होईल. जून 2024 तिमाहीसाठी कंपनीचा EBITDA मार्जिन 12.2 टक्के आणि निव्वळ नफा 283 कोटी रुपये राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x