22 April 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER
x

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, टार्गेट प्राइससह गुंतवणूकीचा सल्ला

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्के वाढीसह 1405 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज हा स्टॉक किंचित घसरणीसह क्लोज झाला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने देखील या स्टॉकवर कव्हरेज सुरू केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर ‘बाय ‘ रेटिंग देऊन 1,775 रुपये टारगेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, झेन टेक्नॉलॉजी कंपनीची सध्याची ऑर्डर बुक, वाढणारा महसूल, आणि अॅसेट लाइट मॉडेल कंपनीचा ROE आणि ROCE मजबूत वाढवू शकतात. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 0.64 टक्के घसरणीसह 1,383.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2026-2027 पर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे ROE प्रमाण 38 टक्के आणि ROCE प्रमाण देखील 38 टक्के सुधारण्याची अपेक्षा आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील तीन वर्षांमध्ये कंपनीची ऑर्डर बुक 1,400 कोटी रुपयेवर जाऊ शकते. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, झेन टेक्नॉलॉजी कंपनीचा महसूल, EBITDA आणि PAT आर्थिक वर्ष 2024-27 पर्यंत सरासरी वार्षिक अनुक्रमे 63 टक्के, 57 टक्के, आणि 56 टक्के CAGR दराने वाढू शकतो.

मागील एका वर्षात झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 72 टक्के वाढली आहे. झेन टेक्नॉलॉजी ही कंपनी मुख्यतः ड्रोन टेक्नोलॉजी, डिफेन्स सिम्युलेटर- आधारित ट्रेनिंग मार्केटमध्ये अग्रणी मानली जाते.

तज्ञांच्या मते, भारतातील सिम्युलेटर आणि काउंटर ड्रोन्सची बाजारपेठ पुढील पाच वर्षांत अनुक्रमे 14,000 कोटी आणि 12,000 कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. या दोन्ही विभागांमध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. डिफेन्स सिम्युलेटर मार्केटमध्ये सध्या फक्त 2-3 कंपन्या व्यवसाय करत आहेत. तर काउंटर ड्रोन मार्केटमध्ये 5-6 कंपन्या व्यवसाय करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price NSE Live 19 July 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या