19 September 2024 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग

Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जून तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी रिलायन्स स्टॉक बीएसई इंडेक्सवर 1.33 टक्के घसरणीसह 3128.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखरे या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव आणखी वाढला होता. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )

स्टॉक बॉक्स फर्मच्या तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या वार्षिक महसुलात लक्षणीय वाढ पाहायला मिळू शकते. तसेच रिफाइनिंग मार्जिन आणि रिटेल व्यवसायातील कमकुवतपणा यामुळे कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात आणि मार्जिनमध्ये किंचित घट होऊ शकते. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1.78 टक्के घसरणीसह 3,116.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या महसूल संकलनात वार्षिक आधारावर 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच कंपनीचा नफा सपाट राहण्याची शक्यता आहे. तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 3,100 रुपयेपर्यंत बाय-ऑन-डिप्सचा सल्ला दिला आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी देखील हा स्टॉक 3100 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 3250 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 20 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Share price(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x