23 November 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Railway Ticket Booking | खुशखबर! ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर 50% सवलत पुन्हा लागू होणार, अपडेट आली

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. भारतीय रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांना खुशखबर देणार आहे. कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर 50 टक्के सवलत देण्यात येत होती.

पण कोविड महामारीच्या काळात रेल्वेने ही सुविधा देणे बंद केले. आता ही आशा पुन्हा एकदा अर्थसंकल्प 2024 पासून दिसू शकते, जेव्हा केंद्रात मोदी सरकार आपला तिसरा कार्यकाळ सुरू करेल.

ज्येष्ठ नागरिकांना लवकरच मिळणार ही सुविधा
31 डिसेंबर 2019 पर्यंत ही सुविधा देण्यात आली होती. त्याअंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 58 वर्षांवरील महिलांना दुरंतो, शताब्दी, जनशताब्दी, राजधानी, मेल आणि एक्स्प्रेस अशा विविध गाड्यांच्या भाड्यात लक्षणीय सवलत देण्यात आली.

रेल्वेसाठी अर्थसंकल्पात होणार अतिरिक्त खर्च
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये सरकार रेल्वेवर अतिरिक्त खर्च करणार आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत मिळण्याची शक्यता पुन्हा वाढू शकते.

यांनाही रेल्वे तिकिटांवर मिळते सवलत
भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. ज्यांना कोणत्याही प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे त्यांच्यासाठी प्रवास सोपा व्हावा यासाठी रेल्वे रेल्वे तिकीटावर 50% ते 100% विशेष सूट देते. या यादीमध्ये 100% पर्यंत सूट मिळू शकणारे रुग्ण आणि अपंग व्यक्तींचा समावेश आहे.

या विशेष आजारांमध्ये कर्करोग, थॅलेसेमिया, टीबी, एड्स, अॅनिमिया, हिमोफिलिया यांचा समावेश आहे. याशिवाय हृदयशस्त्रक्रियेसाठी जाणारे रुग्ण, ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी जाणारे मूत्रपिंडाचे रुग्ण, कुष्ठरोगग्रस्तांना रेल्वे तिकिटात सवलत दिली जाते. त्यासाठी रुग्णांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणेही गरजेचे आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित इतर ही अनेक घोषणा होऊ शकतात. रेल्वेचे जाळे विकसित होणे आणि नवीन गाड्या सुरू होणे अपेक्षित आहे.

News Title : Railway Ticket Booking for senior citizens check details 22 July 2024.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x