24 November 2024 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

TTML Share Price | TTML शेअरने 5 दिवसात दिला 50% परतावा, स्टॉक पुन्हा मल्टीबॅगर परतावा देणार?

TTML Share Price

TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 110 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. मागील पाच दिवसात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 111.40 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20,999.83 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 3.94 टक्के घसरून 98.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

27 मार्च 2020 रोजी टीटीएमएल स्टॉक 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यानंतर या स्टॉकमध्ये 10,900 टक्के वाढ झाली आहे. टीटीएमएल ही कंपनी टाटा टेली बिजनेस सर्व्हिसेस म्हणजेच टीटीबीएस ब्रँड अंतर्गत भारतात उद्योग आणि व्यवसायांसाठी कनेक्टिव्हिटी, सपोर्ट, क्लाउड, आणि सास, सुरक्षा आणि मार्केटिंग सॉल्यूशन्सची प्रदाता कंपनी आहे. टाटा टेलीसर्व्हिस कंपनीकडे व्यापक, उच्च गुणवत्ता आणि मजबूत वायरलाइन असून ही कंपनी भारत आणि 60 पेक्षा जास्त शहरांमध्ये आपले उत्पादन आणि सेवा प्रदान करत आहे.

24 जुलै 2024 रोजी कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ला या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. बुधवार 17 जुलै रोजी टीटीएमएल कंपनीने माहिती दिली की, टाटा टेली बिजनेस सर्व्हिसेसच्या एका नवीन रिसर्चनुसार भारतातील डिजिटल सेवांपासून प्रेरणा घेऊन अनेक एसएमई आपल्या स्पर्धात्मक वाढीसाठी डिजिटल सेवांमध्ये सुधारणा करत आहेत. भारतातील 58 टक्के एसएमई चा विश्वास आहे की, त्यांच्याकडे उच्च स्तराची डिजिटल क्षमता असून ते डिजिटल विकासात सक्षम आहेत. टीटीएमएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये देशातील 50 टक्केपेक्षा जास्त एसएमई आपला व्यवसाय विस्तार करण्यासाठी क्लाउडचा वापर करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price NSE Live 23 July 2024.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x