19 September 2024 9:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होणार मोठी कमाई

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. सोमवारी देखील या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 55.14 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 75,000 कोटी रुपये आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्सने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.90 टक्के वाढीसह 57.78 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनीचा दमण स्थित प्लांट 2004 साली सुरू झाला होता. या प्लांटमध्ये तयार केल्या जाणाऱ्या 20GW पेक्षा जास्त क्षमतेच्या टर्बाइन्सपैकी 60 टक्क्यांपेक्षा जास्त टर्बाइन्स बनवल्या जातात. तज्ञांच्या मते, 2027 पर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीची भारतातील पवान ऊर्जा क्षमता 8-9 GW ने वाढणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी भविष्यात आपली दमण प्लांटची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. यासह कंपनीने दमण प्लांटला स्वयंचलित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीला युटिलिटी आणि C&I विभागात वाढत्या मागणीचा आणखी फायदा होऊ शकते. यासाठी तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘BUY’ रेटिंग देऊन 58 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांना जून 2024 तिमाहीत विंड-टर्बाइन वितरणामुळे कंपनीकडून मजबूत कामगिरीची अपेक्षा आहे.

ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, सुझलॉन एनर्जी कंपनी जून तिमाहीत 2,431.6 कोटी रुपये महसूल संकलित करू शकते. वार्षिक आधारावर कंपनीचा महसूल 80 टक्के आणि तिमाही आधारावर 10.7 टक्क्यांनी वाढू शकतो. कंपनीचा एबिटा मार्जिन 16.8 टक्क्यांवर जाऊ शकतो. जे मागील वर्षी याच तिमाहीत 16.3 टक्के नोंदवले गेले होते. जून तिमाहीत या कंपनीचा समायोजित निव्वळ नफा 325.2 कोटी रुपये राहू शकतो. ज्यात वार्षिक आधारावर 222.5 टक्के आणि तिमाही आधारावर 14.6 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 23 July 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(217)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x