23 November 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

BEL Vs SJVN Share Price | BEL आणि SJVN सहित हे PSU शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा

BEL Vs SJVN Share Price

BEL Vs SJVN Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ज्याने मध्यम वर्गाच्या आणि करदात्यांचा अक्षरशः अपेक्षाभंग केला आहे. अशा कमजोर बजेटवर शेअर बाजाराने देखील नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा मोदी 3.0 चा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. अशा अर्थसंकल्पानंतर बऱ्याच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती.

मात्र पुढील काळात या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा तेजीत येऊ शकतात. गुंतवणूकदारांचे सर्व लक्ष भरघोस परतावा देणाऱ्या रेल विकास निगम लिमिटेड आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सारख्या सरकारी कंपनीवर लागले आहे. हे स्टॉक गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा कमवून देत असतात.

मागील एका वर्षात जवळपास 32 सरकारी कंपन्यांचे शेअर्स असे होते, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. कोचीन शिपयार्ड कंपनीने तर आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या एका वर्षांत 700 टक्के नफा कमावून दिला आहे. आयआरएफसीच्या स्टॉक एका वर्षभरात 485 टक्के वाढला आहे.

तसेच हुडको स्टॉकने गुंतवणुकदारांना एका वर्षात 436 टक्के, रेल विकास निगम कंपनीने 357 टक्के, एनबीसीसी इंडिया कंपनीने 347 टक्के परतावा कमावून दिला आहे. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या सारख्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सने देखील गुंतवणुकदारांना 200 ते 244 टक्के नफा कमावून दिला आहे.

SJVN स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 200 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.068 टक्के वाढीसह 146.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. यासह Mazagon Dock Shipbuilders Limited, BEML लिमिटेड, ITI लिमिटेड, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, MMTC, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सने देखील आपल्या गुंतवणुकदारांना 150 ते 200 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी BEL कंपनीचे शेअर्स 1.23 टक्के वाढीसह 305.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BEL Vs SJVN Share Price NSE Live 24 July 2024.

हॅशटॅग्स

BEL Vs SJVN Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x